शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

ओ शेठ, शेतकऱ्याने नादच केलाय थेट; जावयाला आणण्यासाठी धाडले हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:17 IST

पिंपळगावपासून  पाच कि.मी वरील हेलिपॅडवरून  हे हेलिकॉप्टर नवरदेवाला घेऊन  विवाहस्थळापासू काही अंतरावर लॅँड झाले.

- संजय दुनबळे

नाशिक : हौसेला मोल नसते असे म्हणतात अन् त्यात हौशी शेतकरी असेल  तर विचारायलाच नको. पाच एका शेतकरी वधुपित्याने आपल्या लाडक्या कन्येच्या लग्नात नवरदेवाला आणण्यासाठी  हेलिकाॅप्टर पाठवले. नवरदेवाच्या घरापासून विवाहस्थळ अवघे पाच कि. मी. असताना हौसेसाठी हेलिकाॅप्टरला मात्र दहा किमीचा फेरा मारावा लागला. यामुळे शेतकऱ्याचा नादच खुळा याचीच सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे. 

ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा विवाह पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचा उच्चशिक्षित एकुलता एक मुलगा संकेत यांच्यासोबत नुकताच झाला.  पिंपळगाव बहुलापासून बालाजी लॉन्स हे विवाहस्थळ अवघे पाच-सात किलोमीटरवर आहे. मोटारीने आले तर दहा मिनिटेही लागणार नाहीत. परंतु,एवढ्या अंतरासाठी सासऱ्यांनी जावयासाठी  चक्क हेलिकॉप्टरच पाठवले.

पिंपळगावपासून  पाच कि.मी वरील हेलिपॅडवरून  हे हेलिकॉप्टर नवरदेवाला घेऊन  विवाहस्थळापासू काही अंतरावर लॅँड झाले. तेथून नवरदेवाला गाडीने विवाहस्थळी आणण्यात आले.  पिंपळगाव बहुला ते  विवाहस्थळ या अंतरापेक्षा किती तरी जास्त हे अंतर आहे.  याचीच चर्चा सर्वत्र होती. 

प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते आपल्या मुलीचे लग्न थाटात व्हावे. माझीसुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे लाडक्या कन्येचे लग्न काही तरी वेगळ्या स्वरूपात करायचे ठरवले आणि करून दाखवले.
- गोपीनाथ बोडके, मुलीचे वडील

सासऱ्यांनी जे केले त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला ऐनवेळी सांगण्यात आले की, तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचे आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 
- संकेत नागरे, नवरदेव

टॅग्स :Nashikनाशिक