शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या निर्णयाने कॉँग्रेसमध्ये धुसफूस

By admin | Updated: October 25, 2016 01:24 IST

इच्छुकांची कोंडी : प्रदेशस्तरावर मांडणार गाऱ्हाणे

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावर कॉँग्रेस - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी आता या निर्णयामुळे कॉँग्रेस पक्षात धुसफूस वाढली आहे. पदाधिकाऱ्यांनी ब्लॉक स्तरावर कोणतीही चर्चा न करता निर्णय घेतल्याने प्रदेशस्तरावर गाऱ्हाणे मांडण्याचीही तयारी काहींनी चालविली आहे. महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीने समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी करावी, असा निर्णय शनिवारी (दि.२२) कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांच्या निवासस्थानी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आघाडीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात आला. मात्र, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. प्रामुख्याने, कॉँग्रेस पक्षात इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर प्रकट होताना दिसून येत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास काही प्रस्थापितांना त्याचा फायदा होणार असला तरी नव्याने उमेदवारी करू पाहणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नांना ब्रेक बसला आहे. भाजपाने मागील पंचवार्षिक काळात प्रभागात स्वत:चे केडर वाढविण्याबरोबरच संघटन बळकट करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढविली होती आणि १४ जागा कायम राखल्या होत्या. त्याच धर्तीवर कॉँग्रेसनेही आपले संघटन वाढविण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे तर आघाडी केल्यास सेना-भाजपाचा उधळलेला वारू सहज रोखणे शक्य असल्याचा दावा प्रस्थापित गटाकडून केला जात आहे. दरम्यान, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ब्लॉक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर आघाडी करण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना रुचला नसून त्याबाबत प्रदेश नेत्यांच्या कानावर गाऱ्हाणे घालण्याची तयारी काहींनी चालविली आहे. काही पदाधिकारी व प्रस्थापितांनी आपल्या सोईच्या प्रभागासाठी आघाडीचा निर्णय घेतल्याचाही आरोप ऐकायला मिळत आहे. (प्रतिनिधी)