शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात विद्यार्थिनींची राहण्याची होणार सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:49 IST

ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे,

ठळक मुद्देकस्तुरबा गांधी विद्यालय : रिक्त पदे भरण्याची कार्यवाहीइगतपुरी व पेठ तालुक्यांत विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी नवीन इमारत बांधण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यातील विद्यार्थिनींची शैक्षणिक गळती रोखण्याबरोबरच त्यांना शिक्षण व निवासाची सोय करणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात यंदा नवीन शैक्षणिक वर्षापासून इगतपुरी व पेठ तालुक्यातील वसतिगृहात सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील अति दुर्गम भागातील विद्यार्थिनींना बारावीपर्यंत शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे, आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शैक्षणिक खर्च करण्याची कुवत नसणे, आई-वडील शेतीकाम करीत असताना घर सांभाळणे अशा अनेक कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून शासनाने काही वर्षांपूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येते त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर हा प्रयोग राबविण्यात येऊन साधारणत: चारशे विद्यार्थिनींची सोय करण्यात आली होती. इगतपुरी व पेठ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच अशी व्यवस्था करण्यात आली होती. या योजनेस ग्रामीण भागातील व विशेषत: आदिवासी विद्यार्थिनींचा मिळणारा प्रतिसाद पाहता, इगतपुरी व पेठ तालुक्यांत विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे, तर सुरगाणा व त्र्यंबक तालुक्यांत अनुक्रमे आदर्श समता शिक्षण संस्था व ग्रामोदय शिक्षण प्रसारक या खासगी शिक्षण संस्थांकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.इगतपुरी व पेठ येथील वसतिगृहाचे काम पूर्ण झाल्याने जून महिन्यापासून या दोन्ही तालुक्यांतील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार असल्यामुळे या वसतिगृहातील विद्यार्थिनींची काळजी घेण्यासाठी गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, चौकीदार असे विविध पदे भरण्यास शासनाने अनुमती दिली आहे. येत्या काही दिवसांत ही पदे भरली गेल्यास वसतिगृहासाठी विद्यार्थिनींच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducationशिक्षण