शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत द्राक्षांची  सव्वा लाख मेट्रिक टन निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:36 IST

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत  केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे मोठ्या प्रमाणात फटका; द्राक्ष उत्पादक चिंतित

नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत  केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.जिल्ह्यात साधारणत सप्टेंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होत असतो. बहुतेक अर्ली द्राक्षांची परदेशात निर्यात होत असते. मागील वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे  द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. युरोपातून होणारी मागणी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात आणला. मात्र,  स्थानिक बाजारातही द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला. स्थानिक बाजारपेठेतही फारसी मागणी नसल्याने द्राक्षांचे दर घसरले आहेत. यामुळे उत्पादकांची आर्थिक ओढाताण वाढली असून, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. योग्य दर न मिळाल्याने अनेकांना खत-औषधांची उधारी भागविणेही कठीण झाले आहे. शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.अल्प शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभद्राक्षांचा हंगाम संपत आला असताना मागील आठवडाभरापासून द्राक्षांच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असून किमान दहा ते वीस रुपयांनी दर वाढले आहेत.  मात्र, आता द्राक्ष काढणी अखेरच्या टप्यात आली आहे. साधारणत: एप्रिलअखेरपर्यंत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे तो माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा असली तरी  वाढीव दराचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.युरोप, आखाती देशातून मागणी कमीn यावर्षी नोव्हेंबर २०२० ते ५ एप्रिलपर्यंत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहे. युरोपियन देशांमध्ये ९०,३११, तर नॉनयुरोपीयन देशांमध्ये २७,५८० मेट्रिक टन इतकी द्राक्ष निर्यात झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक युरोपीयन देशांमधील काही प्रांतांमध्ये अद्याप लॉकडाऊन सुरू आहे. आखाती देशांमध्येही कोरोनामुळे द्राक्षांना मागणी नाही.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीfruitsफळे