शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे शोषण

By admin | Updated: April 6, 2017 00:41 IST

मालेगाव :महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी कामगारांसंबंधीच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत.

मालेगाव : लाड व वी. स. पागे कमिटीच्या शिफारशींची मालेगाव मनपा प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याचा ठपका महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी ठेवीत कामगारांसंबंधीच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.राज्यातील महापालिकांमध्ये शासनाने सफाई व इतर कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या योजनांची व लाड व पागे कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त पवार यांनी मालेगाव महापालिकेला भेट दिली होती. प्रारंभी मनपाच्या सभागृहात अधिकारी, कर्मचारी, प्रमुख स्वच्छता निरीक्षक व विविध सफाई कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, मालेगाव मनपात सफाई कामगारांची चुकीच्या पद्धतीने भरती होत आहे. वारसाहक्क नियुक्ती प्रक्रियेत वारसांना डावलले जात आहे. वाममार्गाने कर्मचारी भरती सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधात मनपा आयुक्तांना निर्देश दिले आहेत. लाड व पागे कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अस्पृशता हटविण्याचे काम प्रभावीपणे केले जात नाही. सफाई कर्मचाऱ्यांशी व असंघटित कामगारांचे नाशिक व मालेगाव महापालिकेत शोषण होत असल्याची धक्कादायक बाबही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस नरोत्तम चव्हाण, नरेश चव्हाण, राजेश सौदे, सुनिल चांगरे, बेद आदि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)