शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कुशावर्त तीर्थात झाले भाविकांचे अखंड स्नान...

By admin | Updated: September 26, 2015 22:53 IST

कुशावर्त तीर्थात झाले भाविकांचे अखंड स्नान...

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील महत्त्वाची तिसरी पर्वणी आणि निर्मल आखाड्याचे दहावे शाहीस्नान पार पडल्यानंतर सकाळी ११ पासून अखंडपणे भाविकांनी कुशावर्त कुंडात स्नान करून पदरी पुण्य जोडण्याचे काम केले. रात्रभर भाविकांच्या रांगा संथगतीने कुशावर्त तीर्थाकडे वळत होत्या. उत्तररात्री काहीशी कमी झालेली गर्दी पहाटपासून पुन्हा वाढली असून, आज दिवसभर भाविकांची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. एरवी रात्री ९, साडेनऊपर्यंत शुकशुकाट असणाऱ्या कुशावर्त कुंडावर काल रात्रभर अखंडपणे भाविकांचा स्नानासाठी राबता होता. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनाही भाविकांवर नजर ठेवण्यासाठी रात्र जागून काढावी लागली. महिरावणी, खंबाळे, अंजनेरी अशा दूर अंतरावरून पायी चालत येऊन भाविकांनी कुशावर्तात स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील भाविकांची संख्या यात लक्षणीय होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून संपूर्ण त्र्यंबकनगरीत जागोजागी बॅरिकेडिंग केले असल्याने व भाविक शिस्तीने रांगेतच हालचाल करू शकतील, असे नियोजन असल्यामुळे स्नानासाठी आणि मंदिरात दर्शनासाठी लागलेल्या रांगा गावाच्या चारही दिशांना लांबवर पसरल्याचे चित्र होते. काहीही न खाता-पिता तासनतास रांगेत उभे असल्याने काही भाविकांना चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे असा त्रास झाला. जागोजागी अ‍ॅम्ब्युलन्स व बुथ असल्याने तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. भाविकांची गर्दी पाहता त्र्यंबक-नाशिक रस्ता जाम झाला होता व एकही बस पुढे सरकू न शकल्याची स्थितीही बराच काळ निर्माण झाली होती. आता गर्दी आटोक्यात आली असून, त्र्यंबक-नाशिक रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)