लाल कांद्याच्या आवकेत वाढ

By Admin | Updated: January 15, 2017 00:28 IST2017-01-15T00:28:12+5:302017-01-15T00:28:27+5:30

लाल कांद्याच्या आवकेत वाढ

Enlargement of red onion | लाल कांद्याच्या आवकेत वाढ

लाल कांद्याच्या आवकेत वाढ



लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची या हंगामातील सर्वाधिक आवक झाली. लाल कांदा
आवक ३६,४१० क्विंटल झाली तर बाजारभाव रुपये किमान १७१, तर कमाल ५८५ असे भाव होते. शनिवार व रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने लासलगाव कृषी उत्पन्न
बाजार समितीत लाल कांद्याची पुन्हा एकदा विक्रमी आवक पहावयास मिळाली.
दोन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने लासलगाव बाजार समितीत लाल कांदा विक्र ीसाठी आला होता. या विक्रमी आवकेमुळे बाजार आवार शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकांना मोठी आर्थिक चिंता सतावते आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्चीही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Enlargement of red onion