नाशिक : सातव्या वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी संपाला चांगला प्रतिसाद मिळून कामकाज ठप्प झाले. शिपाई, कारकून, वाहनचालकांसह सर्वच वर्ग तीन व चारचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने मंगळवारी अधिकाºयांना स्वत: शासकीय वाहनाचे सारथी होऊन कार्यालयाचे कुलूप उघडावे लागले. काही ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घ्यावी लागली.संपाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार लवकरच मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, असा आशावाद कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी बोलून दाखविला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या महासंघाने ७ ते ९ आॅगस्ट अशी तीन दिवस संपाची हाक दिली असून, त्याची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. या संपात महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, लेखा व कोषागार यांसह विविध शासकीय कार्यालयांतील वर्ग तीन व चारचे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने त्याचा कामकाजावर विपरीत परिणाम झाला. या संपातून राजपत्रित अधिकारी महासंघाने माघार घेतल्यामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांसह वरिष्ठ अधिकाºयांनी संपाला पाठिंबा दर्शवून मंगळवारी कामकाज सुरू ठेवले, परंतु कार्यालयातील शिपाई, वाहनचालक व लिपिक संपावर गेल्याने या अधिकाºयांना दिवसभर नुसतेच बसून रहावे लागले. विशेष म्हणजे सर्वच वाहनचालक संपावर गेल्यामुळे अधिकाºयांना शासकीय वाहन स्वत: चालवून कार्यालय गाठावे लागले तर शिपाई नसल्याने अधिकाºयांनीच कार्यालये उघडली.महसूल खात्यातील सुमारे १३५० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले. बहुतांशी नागरिकांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी शासकीय कार्यालय गाठले, परंतु बहुतांशी कार्यालयांचे कुलपेच उघडली नसल्याने अभ्यागतांना माघारी फिरावे लागले. जिल्हा परिषदेतदेखील कामकाजावर परिणाम झाला, त्याचबरोबरच जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनीदेखील मंगळवारी रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने केली. महसूलने घेतली २८ जवानांची मदतराज्य कर्मचारी संघटनेचा संप आणखी दोन दिवस चालणार असून, या काळात संपकरी कर्मचाºयांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलीस, गृहरक्षक दलाची मदत घेण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाजासाठी शिपाई व लिपिक नसल्याने किरकोळ कामासाठी गृहरक्षक दलाच्या २८ जवानांची मदत महसूल खात्याने घेतली आहे.
कर्मचारी संपाने कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:37 IST
नाशिक : सातव्या वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी संपाला चांगला प्रतिसाद मिळून कामकाज ठप्प झाले. शिपाई, कारकून, वाहनचालकांसह सर्वच वर्ग तीन व चारचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने मंगळवारी अधिकाºयांना स्वत: शासकीय वाहनाचे सारथी होऊन कार्यालयाचे कुलूप उघडावे लागले. काही ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घ्यावी लागली.
कर्मचारी संपाने कामकाज ठप्प
ठळक मुद्देशुकशुकाट : कार्यालय उघडण्यासाठी गृहरक्षक दलाची मदत