शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित फवारणी पंपाची शेतकऱ्यांना भुरळ

By admin | Updated: September 30, 2014 22:20 IST

खर्च कमी : १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालतो चायना पंप

येवला : स्वयंचलित फवारणी पंपामुळे सध्या ग्रामीण भागात चीन फेवरची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.भारतात कृषी क्षेत्रामध्ये रोज नवनवीन प्रयोग केले जातात. परंतु काही प्रयोग हे सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत असून मजुरांची कमतरता, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम उत्पादनावर होतो. शेतीमध्ये अधिक दर्जेदार पीक उत्पादनासाठी कीटकनाशके, विद्राव्यखते, बुरशीनाशके, तणनाशके यांची फवारणी करावी लागते जुन्यापद्धतीनुसार फवारणी करण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो आणि वेळदेखील लागतो. यावर उपाय म्हणून बाजारात स्वयंचलित चायना औषध फवारणी पंप दाखल झाले आहेत. येवल्यासह ग्रामीण भागात कृषी साहित्य विक्री दुकानांमध्ये औषध फवारणीसाठी अतिशय कमी खर्चात बॅटरीवर चालणारा चायना फवारणी पंप दाखल झाला आहे. हा पंप १२ व्होल्टच्या बँटरीवर चालतो. सोबत चार्जरपण मिळते. या पंपाची क्षमता १० ते १२ लीटर इतकी आहे. वजनाला हलका आहे.स्वयंचिलत बटनामुळे चालू बंद करणे सोपे होते तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ५ ते ६ तास चालतो आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चायना फवारणी पंपची किंमत सरासरी २०००, २५०० ते ३००० रुपयापर्यंत आहे. काही नामांकित पंप उत्पादक कंपन्या बॅटरीसाठी ६ महिन्यांची वारंटीदेखील देतात त्यामुळे पारंपरिक हाताने दांडा हलवून फवारणी करण्यापेक्ष्या थोड्या मेहनतीत आणि कमी वेळात पिकांची औषध फवारणी करण्यासाठी आणि तो खरेदी करण्यासाठी या चायना फवारणी पंपकडे येवले तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.(वार्ताहर)