शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

दोन जिल्ह्यातील वीज सीमावाद संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:49 IST

नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा नाशिककडे : न्यायडोंगरीकरांना मिळाला दिलासाजिल्हा परिषदेच्या आमसभेमध्ये चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या न्यायडोंगरीचा वीजपुरवठा रविवारी (दि. ८) सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी जळगावकडून नाशिक विभागाकडे वीजपुरवठा हस्तांतरित झाल्याने रात्रंदिवस धावपळ करीत असलेल्या वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या लक्षात ही बाब आणून देत, हा सीमावाद कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी केली. त्यास कार्यकारी अभियंता डोंगरे व सहायक अभियंता वाटपाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक बाबींची पूर्तता करून दिल्याने नाशिक विभागातील पिंपरखेड, ता. नांदगाव येथून न्यायडोंगरी उपकेंद्रासाठी वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.न्यायडोंगरी, बिरोळा, हिंगणेदेहरे, पिंप्रीहवेली, परधाडी, पिंपरखेड, चिंचविहीर, चांदोरा, जळगाव खुर्द या गावांना या बदलाचा फायदा होणार आहे.न्यायडोंगरी वीज उपकेंद्रास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून वीजपुरवठा केला जात असे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असे. परंतु वीज वितरणासाठी जळगाव विभाग येत असल्यामुळे नाशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तिकडे जाऊन काम करू शकत नव्हते. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन आर्कि. अश्विनी आहेर यांनी हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदelectricityवीज