शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून युवती ठार : भाजीपाल्यासह द्राक्ष, कांद्याचेही नुकसान

By admin | Updated: March 29, 2015 00:20 IST

जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा अवकाळी पाऊस

नाशिक : जिल्ह्यात इगतपुरीसह मालेगाव, ब्राह्मणगाव, देवळा, कळवण, पाळे खुर्द या भागात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. कसारा घाटात दांड उमरावने येथील कविता अंकुश पुराने या युवतीचा विहिरीवर पाणी भरीत असताना वीज कोसळून मृत्यू झाला.देवळा शहर व परिसरात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, कांद्यांचे डोंगळे यांचे नुकसान झाले. दरमहा नियमितपणे पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.वणी व परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह अर्धातास पाऊस झाला. काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. पाळे खुर्द - कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरात आज बेमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले असून, काढणीला आलेले कांदा गहू पावसाने संपूर्ण भिजला असून, वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.ब्राह्मणगाव - येथे शनिवारी रात्री सात वाजेनंतर वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, मका या पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्वीच्या तुलनेत अत्यंत कमी शिल्लक असलेल्यांपैकी बराचसा आंब्याचा मोहोरही गळाला. तसेच महिनाभरात दुसऱ्यांदा गाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. आधीच्या अवकाळी पावसाचे पीकपंचनामे पूर्ण होत नाही तोच पुन्हा नव्याने अवकाळी पाऊस आल्याने सरकारी बाबूंपुढे गाऱ्हाणी कशी व कितीवेळा मांडायची या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. (लोकमत ब्युरो)