शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

दवाखन्यात निघालेल्या वृध्देला भामट्यांनी लुटले

By admin | Updated: March 30, 2017 22:33 IST

सिन्नर :वृध्देने अनोळखी युवकांच्या दुचाकीची लिफ्ट घेतली. मात्र त्यावर असलेल्या भामट्यांनी सोन्याची दागिने लुटून नेण्याची घटना घडली.

 सिन्नर : दातांची तपासणी करण्यासाठी सिन्नरला निघालेल्या सत्तर वर्षीय वृध्देने गाडी मिळत नसल्याने अनोळखी युवकांच्या दुचाकीची लिफ्ट घेतली. मात्र त्यावर असलेल्या दोघा भामट्यांनी डाव साधत महिलेला मारहाण करीत तीच्या कान व गळ्यात सोन्याची दागिने लुटून नेण्याची घटना दापूर शिवारात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.त्याचे झाले असे, दापूर शिवारात राहणारी जनाबाई निवृत्ती आव्हाड (७०) ही वृध्दा सिन्नर येथे दवाखन्यात दातांची तपासणी करण्यासाठी निघाली होती. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर वृध्दा तेलमाथ्यावर उभी होती. सिन्नरला जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने सदर वृध्देने सिन्नरकडे जाणाऱ्या दुचाकीला हात करुन उभे केले. त्यावर असलेल्या दोघा युवकांना आजीला लिफ्ट देण्याचा बहाणा केला. या भामट्यांनी दुचाकी गोंदे फाट्याकडे न वळवता पाटोळे रस्त्याने कात्रीचा ओहाळाकडे निर्जन ठिकाणी नेली. सदर वृध्देला या दोघांनी चाकूसारख्या शस्त्राचा धाक दाखवून दागिणे देण्याची मागणी केली. वृध्देला मारहाण करीत तीच्या गळ्याती सोन्याची पोत, मणीमंगळसूत्र व कानातले सोन्याचे दागिणे ओरबडून घेतले. कानातील दागिने ओरबडतांना वृध्देच्या कानाला जखमी झाली. सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटल्यानंतर ते पसार झाले. मारहाण झालेल्या वृध्देने कसेबसे रस्त्यावर येवून एका जीपला हात घेवून सिन्नरला गाठले. ओळखीच्या एका महिलेकडे जावून आपबिती सांगितली. त्यानंतर घटनेची माहिती नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली. अनोळखी युवकांकडे लिफ्ट मागून लुबाडणूक झालेली वृध्दा प्रचंड घाबरलेली होती. याप्रकरणी नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली होती. (वार्ताहर)