शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

यू-ट्यूबसह समाजमाध्यमांचा मतदानवाढीसाठी प्रभावी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:31 IST

कोणताही संदेश प्रभावीपणे द्यायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाने या माध्यमांचादेखील प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच ‘मतदान करा’ हा संदेश देण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबचीदेखील मदत घेण्यात येत आहे.

नाशिक : कोणताही संदेश प्रभावीपणे द्यायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाने या माध्यमांचादेखील प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच ‘मतदान करा’ हा संदेश देण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबचीदेखील मदत घेण्यात येत आहे.समाजमाध्यमांचा गवगवा असलेल्या काळात एखाद्या विषयाबद्दल जनजागृती करायची असल्यास यू-ट्यूबसारखे माध्यम प्राधान्याने वापरले जाऊ शकते, हे ओळखून त्याचा वापर करून घेण्याचे धोरण आयोगाने अवलंबले आहे. मतदानाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नाशिकमध्ये वोट कर नाशिककर ही संकल्पना जिल्हाधिकाऱ्याकडून राबविण्यात आली़ फ्लॅशमॉब, पथनाट्य अशा माध्यमांचा यापूर्वी वापर केला जात होता. मात्र अखेरच्या टप्प्यात अधिक झटपट आणि प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबर्सचीही मदत घेतली जात आहे.प्रथम मतदात्यांचा आकर्षणबिंदूअनेक तरु ण मंडळी त्यांच्या पहिल्या वा दुसºया मतदानासाठी उत्सुक असतील. त्यात उत्तर महाराष्टÑात सुमारे लाखभर नव्या मतदारांची भर पडली आहे. अशावेळी तरु णांना आपल्याशा वाटणाºया यू-ट्यूबवरून मतदानाबद्दल जनजागृती करणारे व्हिडीओ अपलोड करवून घेण्यास आयोग प्रयत्नशील आहे. अर्थात निवडणूक आयोगाकडून सांगितले जाण्याआधी अनेक मराठी यू-ट्यूबर्सनी ‘नक्की मतदान करा’ असं आवाहन करणारे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया