दुर्गामाता मंदिर परिसराला रोषणाई

By Admin | Updated: September 30, 2016 22:58 IST2016-09-30T22:57:54+5:302016-09-30T22:58:32+5:30

दुर्गामाता मंदिर परिसराला रोषणाई

Durgamata temple flooded the temple | दुर्गामाता मंदिर परिसराला रोषणाई

दुर्गामाता मंदिर परिसराला रोषणाई

ओझर : नवरात्रोत्सवानिमित्त परिसरातील देवी मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ओझरकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील विविध मित्रमंडळांनी कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. बऱ्याच ठिकाणी मंडप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
शनिवारी होणाऱ्या घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी शुक्रवारी बाजारपेठ फुलली होती. गावातील दुर्गामाता मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिराला विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. राजस्थानी दगडांनी साकारलेले कासार कालिका मंदिरसुद्धा रोषणाईने न्हाऊन निघाले आहे.
तानाजी चौक मित्रमंडळाने यंदा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असून, त्याचीदेखील तयारी मंडळातर्फे सुरू आहे. वरचा माळीवाडा मित्रमंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध उपक्र मांचे आयोजन केले आहे. संभाजी चौकात यंदादेखील राजस्थानी कटपुतलीची जुगलबंदी पाहण्यास मिळणार आहे. शिवाजी चौकने सुंदर असे मंडप उभारले आहे.  भगवाचौक मित्रमंडळाने सुंदर देखावा साकारला आहे. तांबट गल्ली येथील कन्सारा मित्रमंडळाने स्वागत कमान उभारली असून त्यांच्या समाजाच्या मंदिरातच विविध उपक्र म आयोजित केले आहेत. माहेश्वरी महिला मंडळाने यंदा गरबाचे आयोजन केले आहे. येथील एअर फोर्सला असलेल्या चिंधादेवी मंदिरदेखील सुशोभित करण्यात आले असून. कम्युनिटी हॉलमध्ये दुर्गा पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बाजापेठ मित्रमंडळाची चांदीची तुळजाभवानीची मूर्ती आहे. कदम मराठा मंगल कार्यालय येथील भवानी मंदिरदेखील सुशोभित करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Durgamata temple flooded the temple