कसारा घाटात महामार्ग खचल्याने वाहतूक मंदावलीइ

By Admin | Updated: August 1, 2014 01:12 IST2014-07-31T23:17:56+5:302014-08-01T01:12:01+5:30

कसारा घाटात महामार्ग खचल्याने वाहतूक मंदावलीइ

Due to highways in Kasara Ghat, traffic was slowed | कसारा घाटात महामार्ग खचल्याने वाहतूक मंदावलीइ

कसारा घाटात महामार्ग खचल्याने वाहतूक मंदावलीइ

गतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर मुसळधार पावसाने दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच आज हाच रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली. सुमारे पाच फूट खोल आणि तीन फूट रुंद असे त्याचे स्वरूप होते. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु केल्यानंतर दुपारनंतर वाहतूक संथगतीने पूर्वपदावर आली.
मुंबई आग्रा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसामुळे नवीन महामार्गावर लतीफवाडीच्या अलीकडील वळणावर महामार्गाचा भराव पाण्याने वाहून गेला. त्यामुळे रस्ताही सुमारे पंचवीस फुट उभा खचला. हा रस्ता खचला गेल्याने मधोमध दुभंगला गेला. ही माहिती काही वाहनचालकांनी नजीकच्या महामार्ग पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरीकेटस लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी या मार्गावरून संथगतीने एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. दरम्यान, महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार घडले आहे. आता पावसाळ्यात रस्ता दुरु स्त करण्याचे मोठे आव्हान या निमित्त प्रशासनासमोर उभे राहिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to highways in Kasara Ghat, traffic was slowed