नाशिक : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील आदिवासी भागात जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम असून, दारणा नदी काठालगतच्या शेतांमध्ये पाणी घुसले आहे. कसारा घाटात नव्या व जुन्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पेठ तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे सुमारे ५० गावांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यातील पांगारबारी गावाजवळ सीमेंट बंधारा फुटल्याने शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव, सिन्नर, नांदगाव, येवला येथे रिमझिम पाऊस झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}