शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद

By admin | Updated: July 21, 2014 00:55 IST

चांदवड तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद

रेडगाव खुर्द : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने एक टक्कादेखील पेरणी होऊ शकली नाही. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा दीड टक्का म्हणजेच साडेपाच मि.मी. पाऊस झाला आहे. दिवसेंदिवस चारा व पाण्याची भीषण टंचाई वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
यंदा पावसाळ्याच्या दीड महिन्यात ऊन - सावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा यापेक्षा वेगळा अनुभव आला नाही. पंधरा दिवसांपूर्वी काही गावांत पावसाने थोडीशी हजेरी लावली. त्यावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. तरी पेरणीचे क्षेत्र अद्याप एक टक्क्याच्या आतच आहे. गत तीन-चार वर्षांपासून पावसाची अनियमितता व अत्यल्प हजेरीमुळे नदी-नाले कधीच कोरडे झाले आहे.
मागील वर्षी खरीप कसाबसा तर पाण्याअभावी रब्बीला रामराम करावा लागला होता. पावसाने यापूर्वीच्या सर्व अनुभवांना चकवा देत तब्बल दीड महिना उलटूनही डोळे वटारलेले असल्याने सध्या साठवलेले पाणी अन् चारा संपल्याने विशेषत: वाड्या -वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. सध्या विकत पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. महिनाभरापासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेतकरी गंगा काठच्या भागातून पशुधन जगवण्यासाठी साडेतीन ते चार हजार रु पये गुंठा दराने ऊस खरेदी करावे लागत आहे. मागील दोन वर्षांत ठिकठिकाणी दूध संकलन केंद्र झाल्याने अनेकांकडे दुभती जनावरे आहे.
त्यानांही चारा-पाण्याचा प्रश्न भेडसावत असून, दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. (वार्ताहर)