शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

याद्यांमधील गोंधळामुळे मतदारांची पायपीट

By admin | Updated: February 22, 2017 01:27 IST

पश्चिम विभाग : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची गैरसोय

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ व २४ मध्ये मतदारांनी सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात केली. परंतु अनेक मतदान याद्यांमधील घोळांमुळे मतदारांना एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रावर पाटपीट करावी लागली. शिवाय निवडणूक आयोगाने केलेली मतदान केंद्रांची रचनाही मतदारांसाठी डोकेदुखी ठरल्याचे दिसून आले. मतदान केंद्रावरील बूथ कर्मचाऱ्यांनाही मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधून देण्यासाठी अडचणी येत असल्याने अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. तर काही मतदारांच्या हातात मतदार ओळखपत्र असताना यादीत नाव नाही म्हणून मतदान न करता परतावे लागल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. महापालिके त चांगला नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. परंतु मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्र ारी मतदान केंद्रांवर करण्यात आल्या. मतदारांना त्यांच्या निवासापासून दूर अंतरावर मतदान केंद्रावर मतदानाला जाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाही मतदान केंद्रावर उमेदवारांना यादीत नाव मिळाले नाही. नाव मिळाले तर दक्षिण इमारत, उत्तर दरवाजा अशा दिशांच्या गोंधळात नागरिकांना पायपीट करावी लागली. बूथ कर्मचाऱ्यांनाही इमारतीच्या दिशा माहीत नसल्याने त्यांनाही मतदारांना योग्य मार्गदर्शन करता आले नाही. मतदान केंद्र हे मतदाराच्या निवासापासून दोन कि.मी.च्या परिघात असावे, असा नियम असताना असंख्य मतदारांना दूर अंतरावर मतदान केंद्रावर मतदानासाठी जावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या बाबतीत त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. परंतु सुरक्षा यंत्रणेने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना थेट मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत केली. दरम्यान, अनेक मतदारांना चिठ्ठ्या अनेकांना प्राप्त झाल्या नसल्याने त्यांना मतदान केंद्रावर आपल्या नावाची शोधाशोध करावी लागली. परंतु अशी नावे शोधताना बूथ कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सुशिक्षित नागरिकांनी स्वत:च मतदार याद्यांमधील नावे शोधून मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)