आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

By Admin | Updated: January 14, 2017 00:39 IST2017-01-14T00:39:12+5:302017-01-14T00:39:23+5:30

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

Due to the Code of Conduct, the Zilla Parishad has got suspicion | आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

नाशिक : आधी पदवीधर निवडणुकीची आणि आता जिल्हा परिषद व महापालिकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने मिनी मंत्रालयाकडे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच नव्हे तर अधिकारीही निवडणुकीच्या कामात अडकल्याचे चित्र असल्याने जिल्हा परिषदेत सध्या शुकशुकाट जाणवत आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली आहेत. त्यात अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे आदि सहा पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हा परिषद प्रशासनाने जमा केली आहेत. तसेच या जिल्हा परिषद मुख्यालय व सरकारी निवासस्थानी या पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात येणारी दूरध्वनी सेवाही खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पदाधिकारी फिरकेनासे झाले आहेत. त्यातच काही पदाधिकाऱ्यांचे गट आरक्षणात उडाल्याने त्यांना आरक्षित संवर्गातून त्यांच्या गटातून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी असल्याने त्यांची धावपळ सुरू आहे.

ज्या सदस्यांचे गट आरक्षणातून वाचले आहेत, त्यांनी पुन्हा मिनी मंत्रालयात येण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची कामे लागल्याने त्यांचीही जिल्हा परिषदेत हजेरी कमी झाली आहे. साहजिकच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची हजेरी जिल्हा परिषदेत कमी झाल्याने मुख्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the Code of Conduct, the Zilla Parishad has got suspicion