शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद पोलीस वाहनचालकाला अटक

By admin | Updated: August 5, 2016 02:02 IST

रिक्षा अपघात : तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

नाशिक : मद्यधुंद शिकाऊ पोलीस वाहनचालकाने भरधाव वेगाने पोलीस जीप चालवित जुने नाशिकमधील फुले मंडई येथे येथे उभ्या असलेल्या रिक्षांना धडक दिल्याची घटना बुधवारी (दि.३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी वाहनचालक पोलीस शिपाई पोपट साहेबराव ठोंबरे (२५), नियमित वाहनचालक निखिल साळवे, गणेश दिवे या तिघांना पहाटे भद्रकाली पोलिसांनी शहरातून अटक केली आहे.शहीद अब्दुल हमीद चौकातून भोजनाचे पार्सल घेण्यापूर्वी मद्यपान करत पोलिसांनी जीप (एम.एच १५ अ‍ेअ‍े ३०९४) सारडा सर्कलकडे दामटविली. यावेळी नियमित वाहनचालक साळवेऐवजी स्टेअरिंग शिकाऊ वाहनचालक ठोंबरेने हाती घेतले होते. काही मीटर अंतरावर जीप चालवित नेत नाही तोच चालकाचा वाहनावरील आणि स्वत:वरील ताबा सुटला. जीप थेट मंडईच्या रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षांवर जाऊन आदळली. या अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला होता, तर चारही रिक्षांचे नुकसान झाले असून तीन रिक्षा या नवीनच आहे. अपघातानंतर परिसरात युवकांचा मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता; मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रभरातूनच तपास करत तातडीने संबंधित पोलीस जीपमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर मद्यप्राशन करत अंधाधुंदपणे वाहन चालविणे व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तांबे यांनी याप्रकरणी सर्व तपास पूर्ण करत कारवाईचा अहवाल सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे पाठविला असून, भुजबळ यांनीही विभागनिहाय चौकशी करून अहवाल उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. अपघाताच्या वेळी वाहनात मद्याच्या बाटल्या आढळून आल्यामुळे नागरिकांचा रोष अधिक वाढला होता. सदर पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयातील असून, वाहन विभागाची जीप बंदोबस्तासाठी घेतली होती. (प्रतिनिधी)