शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

By admin | Updated: July 30, 2016 21:41 IST

इगतपुरी : जुन्या गोष्टींना उजाळा

इगतपुरी : येथील दर तीन ते चार वर्षांनी हे विद्यार्थी एकत्र येतात व आपल्या एकमेकांच्या भावना व्यक्त करतात. निसर्गाच्या सान्निध्यात शाळा भरविली. इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलच्या १९८४ च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.आम्ही स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत एकमेकांच्या विचारांची देवाण- घेवाण होते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, तसेच ज्या-त्या वयोगटातील भावभावनांचे स्मरण होते, असे मनोगत अजित पारख यांनी व्यक्त केले. १९८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी उद्योगपती, कुणी शेतकरी झाले, कुणी नोकरी करून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर, काहींना नातू, पणतू झाले मात्र उच्च शिक्षण, नोकरी व्यवसाय आणि संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतून गेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते.त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शालेय सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या आधुनिक संपर्क माध्यमांचा बराच उपयोग झाला. कुणी मुंबई कुणी नाशिक, तर कुणी पुणे सर्व लांब लांब गेलेले, आणि बघता-बघता शाळेच्या हजेरी पटावरील ३० ते ३५ हून अधिक मुले- मुली संपर्कात आली आणि इगतपुरीच्या डाक बांगला निसर्गरम्य परिसरात आपल्या कुटुंबासमवेत स्नेहसंमेलन आयोजित केले. याकामी ग्रुपलिडर सरोज आराध्या यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत काहीजण भावनाविवश झाले. आपण लहानपणी कशा खोड्या करायचो. काही सहभागी बायकांनी तुमच्या मित्राला मीच बोलके केले, असे सांगायला विसरल्या नाहीत.यावेळी पुरुषोत्तम चांडक, अरविंद चांडक, नितीन चांडक, दिलीप छाजेड, अजित पारख, संजय बाठिया, अविनाश थोरे, हेमंत पानसे, सुशील पॉल, संजय गोरे, यशवंत उबाले, वसंत राठोड, रइस शेख, हारून शेख, श्रीकांत गायकवाड, प्रशांत गुजराथी, संतोष कदम, संतोष निखळे, संजय श्रीमाळी, अर्जुन खातले, रवींद्र पानगले, विजय गोडे, दीपक चव्हाण, दीपक परदेशी, संजय बेदरकर, भाऊ जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)