९५ टक्के बालकांना पोलिओचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:58+5:302021-02-05T05:42:58+5:30

नाशिक: रविवारी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ९५ टक्के बालकांना पोलिओ डोसचे संरक्षण ...

Dosage of polio in 95% of children | ९५ टक्के बालकांना पोलिओचे डोस

९५ टक्के बालकांना पोलिओचे डोस

नाशिक: रविवारी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ९५ टक्के बालकांना पोलिओ डोसचे संरक्षण देण्यात आले. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यात आली. विशेष म्हणजे सर्वच तालुक्यांमध्ये ०१ टक्केच्या पुढे या मोहिमेला प्रतिसाद लाभला. देवळा तालुक्यात शंभर टक्के लसीकरण झाले तर कळवणसारख्या आदिवासी तालुक्यातदेखील ९९ टक्के लसीकरणा करण्यात आले.

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शून्य ते पाच वर्ष वयोगटातील ४,५३,३४३ लाभार्थी असून त्यापैकी ४, ३१,०९१ इतक्या बाळांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. या मोहिमेसाठी ४,१२२ मोबाइल टीम तर ८२४४ बुथ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लसीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतून व्यापक जनाजगृती करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील टक्केवारीत वाढ झाली. सकाळी ८ वाजता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लाभार्थी बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठांच्या ठिकाणी पथके तैनात करण्यात आली होती. ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रासाठी ६ लाख ६० हजार इतके पोलिओ डोस प्राप्त झाले होते.

Web Title: Dosage of polio in 95% of children