शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वेळची पुनरावृत्ती करू नका

By admin | Updated: August 2, 2014 01:21 IST

पालकमंत्र्यांचा सज्जड दम : दक्ष राहण्याचे आदेश; समन्वय साधण्याच्या सूचना

नाशिक : पावसाची संततधार सुरूच असून, धरणाच्या साठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीत धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली तर पाटबंधारे, महसूल, महापालिका व पोलीस यंत्रणेने एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहून नियोजन करावे. काही वर्षांपूर्वी असमन्वयातूनच नाशिककरांना महापुराला सामोरे जावे लागले होते; त्याची पुनरावृत्ती करू नका, असा सज्जड दम पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला. पुणे जिल्ह्यातील माळीण येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील पाऊस व धरणांची माहिती दिली. त्याचबरोबर आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना व उपलब्ध साधनसामग्रीबाबत अवगत केले. यावेळी भुजबळ यांनी पाटबंधारे खात्याला विशेष करून सूचना केल्या. पाऊस सुरू झाल्याने आता धरणांमध्ये पाणी साठणे सुरू झाले आहे. हवामान खात्याने आणखी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जावा, प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी, रुग्णवाहिका, जेसीबी, क्रेन या सर्व बाबींची अगोदरच पूर्तता केली जावी, ज्या-ज्या ठिकाणी पाणवेली असतील त्या तातडीने काढून पाण्याचा मार्ग खुला करावा अशा सूचना करून भुजबळ यांनी, धरणातून पाणी सोडताना पाटबंधारे खात्याने महसूल, महापालिका व पोलीस यंत्रणेशी अगोदर संपर्क करून तशी माहिती द्यावी. पाणी सोडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेऊन नदीकाठच्या नागरिकांना अगोदर अवगत करावे. या काळात कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये व रजेवर जाऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले. बांधकाम खात्यानेही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, साधन-सामग्रीची यादी तयार करावी, असेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, महापालिका आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर तसेच पाटबंधारे, बांधकाम, आरटीओ, लष्कर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)