शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

By admin | Updated: June 10, 2016 22:59 IST

स्वच्छ भारत अभियान : शौचालय योजनेवर भाजपाचा प्रभाव

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक व गट शौचालयांची योजना महापालिकेमार्फत युद्धपातळीवर राबविली जात असून, महापालिकेने शहरातील ६१ पैकी ७ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यात नगरसेवकपदही भूषविणारे भाजपाचे चार आमदार (एकमेव वळगता) तसेच काही सेना-भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेवर कुरघोडी करत शौचालय योजनेत भाजपाने प्रभाव दाखविल्याने सत्ताधाऱ्यांची दोलायमान स्थिती समोर आली आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात शौचालय उभारणीची योजना राबविली जात आहे. महापालिकेने सर्वेक्षण करून डिसेंबर २०१६ अखेर ७५२८ लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करून देण्याचा आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत २३३० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम झाले असून, ८२२ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गट आणि सार्वजनिक शौचालयांचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे. या योजनेसाठी महापालिकेला आतापर्यंत केंद्रसरकारकडून ५ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, शहरात युद्धपातळीवर राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सात प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. त्यामध्ये सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७, पंचवटीतील प्रभाग ११, नाशिकरोडमधील प्रभाग ३३ आणि ५६, सिडकोतील प्रभाग ४६ आणि ४७ आणि नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. प्रभाग ११ हा भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि ज्योती गांगुर्डे, प्रभाग १५ हा आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. राहुल अहेर, प्रभाग ४६ हा भाजपा आमदार अपूर्व हिरे व सेनेच्या शोभा निकम, प्रभाग १७ हा भाजपा नगरसेवक दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील, प्रभाग ५६ हा भाजपाचे संभाजी मोरुस्कर आणि सविता दलवाणी, प्रभाग ४७ हा सेनेचे सुधाकर आणि हर्षा बडगुजर यांचा असल्याने शौचालय योजनेवर पूर्णत: भाजपाचा प्रभाव दिसून येत आहे. प्रभाग ३३ हा मनसेचे अशोक सातभाई यांचा प्रभाग असून, सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकाचा हा एकमेव प्रभाग हगणदारीमुक्त होऊ शकला आहे. या सर्व प्रभागांमध्ये शौचालय योजना राबविण्यात येऊन काम पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेत सत्ता मनसेची असताना सदर योजना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात प्रभावीरीत्या राबविली गेल्याने मनसेच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)