मनमाड शहरासह निफाड, नाशिक, येवला, नांदगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाला विशिष्ट जातीपुरते मर्यादित न ठेवता सर्व जातीधर्मातील युवकांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. यावेळी अमित काळे , महावीर संकलेचा, रामबाबा पाठारे, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, संदीप पवार, बाळासाहेब कसबे, आकाश थोरात आदी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रसाराला निर्बंध घालणारे नियम पाळून हा मेळावा आयोजित करण्यात होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामिण सचिव कपिल तेलुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरख चौधरी, दीपक साळवे, साइनाथ पगारे, राजेंद्र धिवर आदींनी परिश्रम घेतले.
फोटो - १७मनमाड आरपीआय
मनमाड येथे आयोजित रिपाई युवक मेळावाप्रसंगी उपस्थित मान्यवर.
170921\312717nsk_21_17092021_13.jpg
फोटो - १७मनमाड आरपीआयमनमाड येथे आयोजित रिपाई युवक मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवर