शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पुरवठा विभागाची सातशे क्विंटल तूरडाळीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 18:51 IST

नाशिक शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे.

ठळक मुद्दे शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर शंभरी पार जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली

नाशिक : शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. सध्या मागणीनुसार व उपलब्धतेनुसार रेशन दुकानात तूरडाळ स्वस्त दरात मिळत असली तरी ती गुणवत्तेबाबतच्या तक्रारींमुळे तूरडाळीसह कडधान्याचा सुमारे १८० क्विंटल साठा पडून आहे. कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून, किराणा दुकानात उडीदडाळ ११० ते १२० व मूगडाळ शंभर ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. मागील एक आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने सर्वाधिक मागणी असलेल्या पाच तालुक्यांच्या मागणीच्या आधारे ७२० क्विंटल डाळीची मागणी शासनाकडे केली आहे. मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेशमधूनही डाळींचा पुरवठा होतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात खरिपाचे मोठे नुकसान केले असून, याच कांदा, कापूस, सोयाबीनसह तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अपेक्षेप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचे भाव वाढण्याची शक्यता असून, सामान्य घटकालाही मागणीनुसार डाळींचा पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावरून प्राप्त मागणीनुसार जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे डाळींची मागणी नोंदवली आहे. डाळी शंभरीपार नाशिकच्या बाजारात तूर, मूग, हरबरा, उडीद, मूग आदी डाळींच्या किमतीने शंभरी गाठली असून, डाळींच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली आहे. मागणी आणि पुरवठ्यासोबत उपलब्धतेचा विचार करून जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियमित प्रक्रियेतून ही मागणी केली असून, लवकरच ही डाळ उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :foodअन्नNashikनाशिकMarathwadaमराठवाडाMadhya Pradeshमध्य प्रदेश