जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांना प्रारंभ

By Admin | Updated: August 2, 2014 01:25 IST2014-08-02T00:06:14+5:302014-08-02T01:25:57+5:30

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांना प्रारंभ

District Level Fencing Competition started | जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांना प्रारंभ

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांना प्रारंभ

नाशिक : जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेस आजपासून प्रारंभ झाला़
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे क्रीडा कार्यालयाचे प्रशिक्षक राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़ याप्रसंगी संघटनेचे सचिव राजू शिंदे, भारतीय संघाचे प्रशिक्षक ललित गांधी, पंच श्वेता शिंदे, स्नेहलता विधाते, जय शर्मा आदि उपस्थित होते़ स्पर्धेत जिल्'ातील ६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे़ विजयी खेळाडूंमधून जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून, हा संघ ८ आॅगस्टला सोलापूर येथे होणाऱ्या राज्य तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे़ आजचा निकाल - सॅबर मुली- शिवानी देशमुख, अस्मिता दुधारे, खुशी अहेर, सायली सूर्यवंशी़ मुले- दिग्विजय सोनवणे, दुष्यंत शिर्के, आदित गोरे, वैभव सातकऱ
डेव्हिड ट्रेजेग्युएट पुणे संघात
मुंबई : इंडियन सुपर लीगला (आयएसएल) अवघे काही महिने शिल्लक असताना प्रत्येक संघ आपापले पत्ते उघड करीत आहे. या स्पर्धेतील राजेश वाधवान आणि सलमान खान यांच्या मालकीच्या पुणे संघाने हुकमी एक्का समोर आणला. ‘फुटबॉल क्लब पुणे सिटी’ असे नाव असलेल्या या संघात फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड ट्रेजेग्युएट खेळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पुण्याने एसीएफ फिओरेंटिना संघाशी करार केल्याची घोषणाही केली.

Web Title: District Level Fencing Competition started