जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 03:35 PM2019-10-16T15:35:45+5:302019-10-16T15:36:27+5:30

कवडदरा (इगतपुरी) : गेल्या आठवडाभरापासून उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही प्रमाणात पाऊसही थांबला आहे. तरी हवामान खात्याकडून परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात दररोज बदल होताना दिसत असून गेल्या दोन दिवसापासून अचानकपणे उष्णतेचे प्रमाणात वाढ होते. तसेच काही वेळा कमी होताना दिसत आहे.तापमानातील चढउतारामुळे आरोग्यावर त्याच्या परिणाम जाणवत आहे.

District hits October hit | जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा

जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा

Next

कवडदरा (इगतपुरी) : गेल्या आठवडाभरापासून उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही प्रमाणात पाऊसही थांबला आहे. तरी हवामान खात्याकडून परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात दररोज बदल होताना दिसत असून गेल्या दोन दिवसापासून अचानकपणे उष्णतेचे प्रमाणात वाढ होते. तसेच काही वेळा कमी होताना दिसत आहे.तापमानातील चढउतारामुळे आरोग्यावर त्याच्या परिणाम जाणवत आहे. यावर्षी खूप जास्त प्रमाणात पाऊस कवडदरा परिसरात झाला.दरवर्षी सप्टेंबर अखेरीस वातावरणातील तापमानात बदल होताना दिसत असतो. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वातावरणात बदल होवून उष्मा जाणवू लागला आहे. सध्या परतीचा पाऊस पडेल अशी आशा असतानाच आॅक्टोबर महिन्यातील वाढत्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु आहेत. परीक्षेचे पेपर असल्याने दुपारी एकच्या सुमारास शाळा,महाविद्यालये सुटतात. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तसेच शेतातील काही पीकाची काढणी चालू आहे.त्यामुळे शेतात काम करणार्या व्यक्तीना उन्हामुळे उष्णतेत वाढ झाल्याने मानसिक त्रास सहन करत उन्हात काम करावे लागत आहे. या वाढत्या उष्णतेचा परीणाम पशू-पक्षांवर होताना दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी वृक्षाच्या दाट सावलीचा आधार घेत आहेत. ज्या प्राण्यांना उष्णतेचा ञास होता. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. आकाशात उडणा-या पक्षांना उष्ण वा-याचा ञास सहन करावा लागत आहे. तसेच उन्हात माळरानावर चरणा-या गायी, म्हशी, बैल, शेळ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.

Web Title: District hits October hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक