शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप

By admin | Updated: November 15, 2014 00:52 IST

शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सुमारे अकराशे शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप करण्याबरोबरच नागरिकांची कागदपत्रे गहाळ करणाऱ्या सेतू ठेकेदारावर कारवाई व एजंटांची मध्यस्थी दूर करण्याचे आश्वासन धान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून धान्य वितरण कार्यालयात शिधापत्रिकेसाठी नागरिकांची ससेहोलपट होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार व महा ई-सेवा केंद्र चालकांची संयुक्त बैठक घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यात आॅगस्ट महिन्यापासून धान्य वितरण कार्यालयातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने जवळपास अकराशे नागरिकांचे शिधापत्रिकांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती धान्य वितरण अधिकारी उजागरे यांनी दिली. त्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन शिधापत्रिका वाटप करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रे गहाळ होण्याच्या अनेक घटना घडत असल्याने त्यांच्या कामकाजाच्या अनियमिततेबाबत दोन लाख रुपये दंड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आला असून, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याबद्दल उजागरे यांनी हतबलता व्यक्त केली. यावेळी रेशन दुकानदारांनी आपल्या समस्या मांडल्या. कमिशन वाढवून मिळावे, वाहतूक खर्च वाढवून द्यावा, पोषण आहाराचे पैसे मिळावेत, सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळेल इतके नियतन मंजूर करावे अशा मागण्या केल्या. त्यावर शासनाकडून सध्या एपीएल म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी तीस टक्केच धान्याचा कोटा मंजूर केला जात असल्याने त्या प्रमाणात दुकानदारांना त्याचे वाटप केले जात असल्याची माहिती जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिली, तर यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन आमदार फरांदे यांनी दिले. सेतू कार्यालय व पुरवठा कार्यालयाबाहेर नागरिकांना मार्गदर्शनार्थ फलक लावण्याच्या व कार्यालयाला दलालांपासून मुक्त करण्याच्या सूचना केल्या. येत्या आठ दिवसांत रेशनसंदर्भातील तक्रारींसाठी जनता दरबार घेऊन जाहीर सुनावणी करण्याचे फरांदे यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)