निराधार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

By Admin | Updated: September 26, 2016 23:54 IST2016-09-26T23:53:53+5:302016-09-26T23:54:34+5:30

घोषणा : कसमादेतील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण, निवास मोफत

Distribution of Literature to Unskilled Students | निराधार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

निराधार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

देवळा : राज्यातील १०० अनाथ व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व मदतनिधी वाटप कार्यक्र म देवळा येथे संपन्न झाला. कसमादे परिसर विकास मंडळाच्या वतीने यापुढील काळात अनाथ व निराधार मुलांना दहावीपर्यंतच्या शिक्षण व निवासाची सोय मोफत करून देण्याची घोषणा यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केली.
येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने राज्यातील १०० अनाथ व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व मदतनिधी वाटप कार्यक्रम ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बच्चू कडू, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, सिनेअभिनेते भूषण कडू, जि.प.चे कृषी सभापती केदा अहेर,मंदार फणसे, संजय आवटे, अजित चव्हाण, विजय तनपुरे, प्राचार्य हितेंद्र अहेर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते. आमदार बच्चू कडू व भूषण कडू यांना शिवनिश्चल हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी केदा अहेर यांनी मदतनिधी कार्यक्रमासाठी देवळा येथील सहकारी संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. राहुल अहेर यांनी आगामी काळात शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने आलेल्या अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना कसमादे परिसर विकास मंडळाच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण व निवासाची मोफत व्यवस्था करण्याचे संस्थेच्या वतीने जाहीर केले व ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोसावी यांनी केले. भगवान अहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजय पगार, जयप्रकाश कोठावदे, डॉ. प्रशांत निकम, मुन्ना आहिरराव, डॉ. देवेंद्र चव्हाण, भाऊसाहेब पगार, भारत कोठावदे, अशोक अहेर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवनिश्चल ट्रस्टच्या कार्याचा गौरव
राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक आदि जिल्ह्यांसह गोवा येथील अनाथ व निराधार मुलामुलींना शहरातील मान्यवरांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री दादा भुसे यांनी मनोगतात शिवनिश्चल ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला. राज्यात सुरू असलेल्या मराठा क्र ांती मोर्चांची दखल घेऊन मंत्र्यांपासून ते तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याची व त्यांच्याशी नीट वागण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीकडे गावातील अनाथ व निराधारांची अपंग व्यक्तींप्रमाणे नोंद झाली पाहिजे, असे मत आमदार बच्चू कडू यांनी यावेळी मांडले.
 

Web Title: Distribution of Literature to Unskilled Students