विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप

By Admin | Updated: July 28, 2014 23:27 IST2014-07-28T22:35:53+5:302014-07-28T23:27:38+5:30

विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप

Distribution of free schools to students | विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप

विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप


नाशिक : येथील जैन सोशल ग्रुप युवा फोरमतर्फे आनंदऋषीजी शाळेत मोफत शालेय दप्तर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १५० गरजू विद्यार्थ्यांना दप्तरे वाटण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक लालचंद जैन, मोहनलाल जैन, तसेच जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनचे खजिनदार सचिन शाह, जैन सोशल गु्रपचे अध्यक्ष सचिन गांग, सचिव प्रणय संचेती, जैन सोशल ग्रुप युवा फोरम, नाशिकरोडचे अध्यक्ष केविन संचेती आदि उपस्थित होते. युवा फोरमचे जनसंपर्कप्रमुख विकिशा ओस्तवाल यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचे स्वागत भूषण संचेती यांनी केले. सहसचिव प्रीतेश साखला यांनी आभार मानले. तन्मय हिरण, सिद्धार्थ चोरडिया, सायली खाबिया, अश्विनी कांकरिया आदि पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

Web Title: Distribution of free schools to students