शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांविरोधात अपात्रतेची कारवाई

By admin | Updated: April 28, 2017 01:39 IST

येवला : आगामी २०१७च्या खरीप हंगामासाठी कर्जवाटप होत नसल्याने, जिल्हा बँकेला सर्वसामान्य सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

येवला : पाचशे आणि हजाराच्या नोटाबदलीनंतर अडचणीत असलेल्या मागील खरीप हंगामातील कर्जरक्कम भरणा करूनही आगामी २०१७च्या खरीप हंगामासाठी कर्जवाटप होत नसल्याने, जिल्हा बँकेला सर्वसामान्य सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सहकार खाते आणि जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी थकबाकीदार सोसायटी संचालकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना साकडे घातले आहे.येवला तालुका सहकारी संस्था सहायक निबंधक, जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी मंगळवारी दिवसभर सहायक निबंधक कार्यालयात दिवसभर तळ ठोकून होते. ८२ पैकी २३ विविध कार्यकारी सोसायटींच्या १५२ संचालकांकडे असणारी २ कोटी १० लाख १० हजार रकमेच्या वसुलीसाठी संबंधित संस्थेच्या सचिवाला बोलावून थकबाकीदर संचालकांची माहिती गोळा केली. या १५२ संचालकांना सहकार अधिनियम अन्वये सुनावणी नोटिसा दिल्या जाणार असल्याचे विभागीय अधिकारी एस. एस. पैठणकर यांनी सांगितले. सुनावणी नोटिसीनुसार, सहकारी सोसायटीचे जे संचालक ८ मे पर्यंत थकबाकी कर्ज रकमेचा भरणा करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. (वार्ताहर)