शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वादविवाद स्पर्धा बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:00 IST

‘पोलीस रेझिंग डे’निमित्त पोलीस दलाच्या वतीने नाशिक परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधून १३ महाविद्यालयांतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

नाशिक : ‘पोलीस रेझिंग डे’निमित्त पोलीस दलाच्या वतीने नाशिक परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधून १३ महाविद्यालयांतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या अक्षदा देशपांडे व अहमदनगरच्या अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या वैष्णवी जाधव यांनी परीक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांची मने जिंकत राज्यस्तरीय संघात स्थान पटकाविले.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१०) वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अंमली पदार्थांचा गैरवापर रोखण्याकरिता कायद्याची अंमलबजावणी करणाºया संस्थांऐवजी पालक व समाजाची भूमिका आहे किंवा नाही?असा विषय देण्यात आला  होता.परिक्षेत्रातील पोलीस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालय ग्रामीण, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते. वक्तृत्वावर प्रभुत्व असलेल्या इयत्ता कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या आंतरजिल्हा वादविवाद स्पर्धेत सहभागाची संधी देण्यात आली होती. डॉ. गुंजन कुलकर्णी, मानसशास्त्र तज्ज्ञ मृणाल भारद्वाज यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. त्याअनुषंगाने पोलीस दलातर्फे विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत असून, याची सुरुवात वादविवाद स्पर्धेपासून झाल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास प्रतिसाद लाभला.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक