शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कामगार संघटनेची ऑनलाईन निवडणुकीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करतांना माजी सरचिटणीस संजय कुटे, माजी सहचिटणीस अनिल मंडलिक, ...

कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करतांना माजी सरचिटणीस संजय कुटे, माजी सहचिटणीस अनिल मंडलिक, प्रशांत आहेर यांनी सांगितले, कामगार संघटनेचा त्रैवार्षिक कार्यकाळ १५ जूनला संपला असल्याने कामगार संघटनेची घटना व नियमावलींनुसार त्रैवार्षिक निवडणूक तत्काळ होणे गरजेचे आहे परंतु कोविड नियमांचे बंधन असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून बॅलेट पेपरवरील निवडणुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे तरीसुद्धा कामगार संघटनेपुढे (पारदर्शी स्वरूपाने) ऑनलाईन निवडणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. कोरोनाच्या नावाखाली कामगार संघटनेची निवडणूक बॅलेट पेपरवर होणेसाठी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे शक्य होणार नाही म्हणून ऑनलाईन निवडणुकीचा पर्याय वापरावा, असे सांगितले. ही निवडणूक कारखाना आवारातच होणार असल्याने नियमित ड्युटीप्रमाणेच कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रियादेखील सर्व कामगार सुरळीत पार पाडतील, अशी ग्वाही दिली. यासंदर्भात कामगार संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाईन पद्धतीने परंतु पारदर्शी स्वरूपात कशाप्रकारे घेता येईल याबाबत चर्चा करून ठराव घेण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

कोट...

कामगार संघटनेच्या घटना व नियमावलीनुसार निवडणूक तत्काळ होणे गरजेचे आहे. कार्यकाळ संपला असल्याने विद्यमान सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा मोह सोडून लोकशाही मार्गाने निवडणूक घ्यावी, अशी कामगारांची मागणी आहे.

- संजय कुटे,

माजी सरचिटणीस,

एच. ए. एल. कामगार संघटना