ओझरटाऊनशिप : संततधार पावसामुळे ओझर बसस्थानकात गेल्या दोन दिवसांपासून पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सायखेडा, पिंपळगाव, ओझर तसेच निफाड तालुक्यातील नागरिकांची या बसस्थानकात दिवसभर वर्दळ असते. असंख्य प्रवासी या बसस्थानकात ऊन पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी आसरा घेत असतात. स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने येथील निवाराशेड मध्ये जाणसाठी रस्ता राहिला नाही. स्थानकात बस उभी केल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी चिखलातून जावे लागते. या भागातील साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}