शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरक्कम नसल्याने अडचण : आडत्यांनी मागून घेतली मुदत

By admin | Updated: November 11, 2016 01:23 IST

ऱ्यांनी शेतमाल विकला उधारीत

पंचवटी : काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचारावर आळा बसावा यासाठी शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने सर्वसामान्य नागरिकांपाठोपाठ शेतकऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली. आडत्यांकडून रोख रक्कम घेणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी रोख पैसे मिळू शकले नाहीत, त्यामुळे उधारीत माल विकावा लागला.मंगळवारी रात्री शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी, आडते व व्यापाऱ्यांनाही फटका बसला. शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर आडत्यांकडून मिळणारी रक्कम लागलीच मिळणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना शेतमालाची किरकोळ रक्कम मिळाली. त्यातही पाचशे, हजार रुपयांच्या नोटा आडत्यांकडून मिळाल्या त्या घ्याव्या लागल्या, तर काही शेतकऱ्यांना आडत्यांनी दोन दिवसांची मुदत घेऊन रकमेची परतफेड करण्याचे आश्वासन दिले आहे. बाजार समितीत शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या खऱ्या; मात्र व्यापाऱ्यांनी आडत्यांना दिलेल्या पाचशे व एक हजार रुपये दराच्या नोटा काही आडत्यांनी स्वीकारल्या नाही तर जी रक्कम असेल ती परस्पर बॅँकेत जमा करण्यास सांगितली. शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून पैसे काढून देण्याची जबाबदारी ही आडत्याची असते. काही व्यापाऱ्यांनी आडत कंपनीत रक्कम जमा करण्यासाठी धाव घेतली. (वार्ताहर)