शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांनी मागविली बदल्यांची माहिती

By admin | Updated: June 25, 2014 00:15 IST

उपाध्यक्षांनी मागविली बदल्यांची माहिती

 

नाशिक : जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या एकूण सर्व बदल्यांची, तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिकारातील बदल्यांची माहिती प्रशासनाकडून मागविली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागांतर्गत करण्यात आलेल्या बदल्यांकडेच त्यांचा रोख असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप संपतराव सकाळेंकडून करण्यात येत आहे. त्यातच त्यांनी जिल्हा परिषदेचा निधी सर्व सदस्यांना समान वाटप झाला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वपक्षीय सदस्यांचा एक दबाव गट निर्माण करू, असेही सांगितले आहे. मंगळवारी (दि.२४) त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांची माहिती मागविली आहे. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेषत: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिकारात करण्यात आलेल्या बदल्यांबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे. न्यायालयाचे आदेश काय आहेत, प्रत्यक्षात बदल्या कोणत्या करण्यात आलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केले आहेत.(प्रतिनिधी)