शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

डिझायनर पणत्यांना मागणी

By admin | Updated: October 13, 2016 23:59 IST

आली दिवाळी : विविध आकारांचे पर्याय उपलब्ध

 नाशिक : ज्याच्या नावातच दीप आहे अशा दिव्यांचा सण अर्थात दिवाळी अवघ्या १४ दिवसांवर येऊन ठेपली असल्याने तिची चाहूल बाजारपेठांमध्ये जाणवू लागली आहे. पंचवटी, मेनरोड, शालिमार आदिंसह उपनगरांतील विविध बाजारपेठांमध्ये साधारणत: अडीचशेहून अधिक प्रकारच्या पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. कच्च्या मालांच्या किमतीत झालेली वाढ, इंधनाचे वाढलेले दर, मजुरी यात झालेली वाढ यामुळे यंदा पणत्यांच्या किमतीत किंचितशी वाढ झाली आहे.शंख, कोयरी, मोर, मासा, पान, स्वस्तिक, दीपमाळ, कासव, कंदील, तुळसी वृंदावन, घर, कलश अशा आकारांतील कलात्मक पणत्या यंदा बाजारात दाखल झाल्या असून प्रत्येकाला आवडीप्रमाणे माती, लाल माती, चिनी माती, टेराकोटा या प्रकारांत पर्याय उपलब्ध होत आहेत. याशिवाय यंदा लाल, चॉकलेटी रंगांबरोबरच सप्तरंगांमध्येही पणत्या मिळत आहेत. पणत्यांच्या जोडीला गुलाब, मोगरा, पॉँड्स, चमेली, सोनचाफा आदि प्रकारांतील सुगंधी मेणबत्त्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. या ३० ते ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तरंगणारे दिवे, कंदीलच्या पणत्यांनाही पसंती मिळत आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबरच चिनी माती, क्रिस्टल, प्लॅस्टिकच्या पणत्याही बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय विविध बचत गट, सामाजिक संस्थांकडून पणत्यांवर क्रिस्टल, मणी, टिकल्या, लेस आदि साहित्य सजवून कलात्मक पणत्याही विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)