व्यवहार स्टेट बॅँकेमार्फत करण्याची मागणी

By Admin | Updated: August 1, 2014 01:13 IST2014-07-31T22:11:17+5:302014-08-01T01:13:32+5:30

व्यवहार स्टेट बॅँकेमार्फत करण्याची मागणी

Demand for transaction through State Bank of India | व्यवहार स्टेट बॅँकेमार्फत करण्याची मागणी

व्यवहार स्टेट बॅँकेमार्फत करण्याची मागणी


त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमार्फत होणारे वित्तीय व्यवहार विशेषत: शिक्षकांचे मासिक वेतन भारतीय स्टेट बँकेमार्फत व्हावेत, अशी मागणी येथील शिक्षकांनी केली आहे. बँकेत खाते उघडण्याची परवानगी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद वित्त लेखाधिकारी यांनी देणे आवश्यक आहे.
जिल्हा बँकेमार्फत चालणारे व्यवहार जुन्या प्रणालीनुसार चालत असल्याने शिक्षकांचे वेतन १५ दिवस उशिराने किंवा थेट तिसऱ्या महिन्यात होत असल्याची तक्रार त्र्यंबक तालुका शिक्षक मंचचे अध्यक्ष गणेश बर्के, अमृता जगदाळे, दिनेश महाले, सतीश शिसव, दत्तात्रय चासकर, उमेश हांगे, सादिक उस्मानी आदिंनी केली आहे.
आपल्या पत्रकात त्यांनी असेही म्हटले आहे की, पगार वेळेवर न झाल्याने घरांच्या कर्जाचे दिलेले चेक बाउन्स होणे, दंड होणे असे प्रकार घडतात.याशिवाय शिक्षकांना अनेक वित्तीय समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असते. घरकुलांचे चेक्स तसेच अन्य योजनांच्या अनुदानाचे चेक, कर्ज प्रकरणांचे चेक वेळेवर न मिळाल्याने वित्तीय दंड भरण्याचे प्रकार टळत नाहीत. प्रत्येक बँकेचे व्यवहार हे आॅनलाइन चालतात, तथापि जिल्हा बँक यंत्रणा जुन्या पद्धतीप्रमाणे व्यवहार करीत असल्याने पंचायत समितीच्या सर्व वित्तीय व्यवहारास उशीर होत आहे.

Web Title: Demand for transaction through State Bank of India