सिन्नरकरांची वीजबिले कमी करण्याची मागणी

By Admin | Updated: July 29, 2014 00:51 IST2014-07-29T00:04:39+5:302014-07-29T00:51:23+5:30

सिन्नरकरांची वीजबिले कमी करण्याची मागणी

Demand for Senerarkar's electricity bill reduction | सिन्नरकरांची वीजबिले कमी करण्याची मागणी

सिन्नरकरांची वीजबिले कमी करण्याची मागणी

 : शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदनसिन्नर : वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात असून, वापरापेक्षा अधिक बिले देऊनही ती कमी करून मिळत नसल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची बिले त्वरित कमी करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती आहे. विहिरींना पाणी नसल्याने कृषिपंप सुरू होऊ शकले नाहीत. तरीही अनेक शेतकऱ्यांना वीज महावितरण कंपनीने अंदाजे वाढीव बिले दिली आहेत. कुंदेवाडी येथील गणपत बाबूराव नाठे यांना १३ हजार १४० रुपये वीजबिल दिले आहे. नाठे हे विजेचा घरगुती वापर करतात, असे असतानाही हे एका महिन्याचे बिल देण्यात आले आहे. ते कमी करून मिळावे यासाठी अपंग असलेल्या नाठे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अनेकदा खेटा घातल्या. मात्र त्यांना अधिकाऱ्यांकडून हे बिल भरावेच लागेल, असे सांगितले जात आहे. असाच अनुभव कोनांबे येथील ज्येष्ठ नागरिक चंद्रभान डावरे यांना आला आहे. त्यांना तब्बल ३३ हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहे. त्यांनीही वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या मात्र उपयोग झाला नाही. प्रथम बिल भरा आणि तुमचे म्हणणे सांगा, असे उत्तर त्यांना मिळाले. डावरे यांचा मुलगा सैन्य दलातून सुटीवर घरी आल्यावर त्यांना त्याची माहिती देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य दलात काम करीत आहे. मात्र त्यांनाही तेच उत्तर मिळाल्याने त्यांनी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार केली आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांना देण्यात आलेली वाढीव वीजबिले त्वरित कमी करून द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.(वार्ताहर)

त्यावर ग्राहक संरक्षण कक्षाचे शहराध्यक्ष संजय चव्हाणके व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

Web Title: Demand for Senerarkar's electricity bill reduction