बागलाण विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी

By Admin | Updated: June 25, 2014 00:11 IST2014-06-24T21:12:26+5:302014-06-25T00:11:54+5:30

बागलाण विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी

Demand for the release of Baglan assembly seat Shiv Sena | बागलाण विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी

बागलाण विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी


सटाणा : बागलाण विधानसभा मतदारसंघ महायुतीत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला असताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसाठी सोडण्यात यावा, या आशयाची मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे तालुका संघटक मुन्ना सोनवणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
शिवसेना बागलाण तालुक्यातील शिष्टमंडळाने मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांना भेटून निवेदन सादर केले. भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुती असताना भाजपा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. या ठिकाणी शिवसेनेसह भाजपा पक्षाची ताकद आहे. शिवसेनेचे संघटनदेखील मजबूत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असल्याने शिवसेनेला जागा सोडण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अनिल सोनवणे, दिलीप अहिरे, आनंदा लाडे, राजनसिंग चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Demand for the release of Baglan assembly seat Shiv Sena