शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूककामी नियुक्त राखीव कर्मचाऱ्यांची मानधनाची मागणी

By admin | Updated: April 5, 2017 00:23 IST

येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राखीव असणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. या कर्मचाऱ्यांनी मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे.

येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत राखीव असणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. या कर्मचाऱ्यांनी मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्यापूर्वी येवला तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खासगी संस्थांतील व जिल्हा परिषदेमधील एकूण ११०४ कर्मचाऱ्यांची निवडणूककामी नियुक्ती केली होती. यासाठी कार्यालयाने निवडणूक कार्यात १००२ व राखीव म्हणून १०२ असे ११०४ कर्मचारी नियुक्त केले होते. नियमित कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज आटोपल्यानंतर ताबडतोब मानधन देण्यात आले. परंतु काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते. याची कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. सदर कर्मचारी निवडणूक कामातील नियोजनाप्रमाणे मार्गदर्शन घेतले. प्रत्येक बैठकीसाठी उपस्थित होते. तशी नोंदही उपस्थिती पत्रकात आहे. परंतु या कर्मचाऱ्यांचे निवडणूक आदेश तहसील कार्यालयाने २१ रोजी जमा केले व ते आदेश रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु ऐनवेळी राखीव जाहीर करण्यात आलेले कर्मचारी दिनांक ३१ जानेवारी, व ९ व २० फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रशिक्षण व बैठकीसाठी कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित होते. परंतु सदर कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामाचे मानधन तहसील कार्यालयाने महिन्यानंतरही अदा केले नाही. याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे या तत्कालीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सदर कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. इतर तालुक्यांमध्ये सर्व राखीव कर्मचाऱ्यांचे मानधन तत्काळ अदा केले गेले, मात्र येवला तालुक्यात उशीर का, असा सवाल कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)