शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची मागणी

By admin | Updated: October 10, 2015 23:04 IST

जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची मागणी

घोटी : शासन पाणीटंचाई वर मात करण्यासाठी राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबवीत असून, हे अभियान राबविताना शासनाने जे निकष ठरवले आहेत ते आदिवासी तालुक्यावर अन्यायकारक असल्याने शासनाने हे निकष बदलून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यासारख्या आदिवासी तालुक्याचा या अभियानात समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दरम्यान आदिवासी तालुक्याचा या अभियानात समावेश होण्यासाठी शासनाने पन्नास टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असावी हि जाचक अट वगळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शासन सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र या धोरणानुसार राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबवीत आहे. कृषी विभागाकडून राबविल्या जाणा-या या अभियानात शिवार गाव निवडीच्या निकषानुसार आदिवासी भागावर पूर्णपणे अन्याय झाला आहे. संपूर्ण आदिवासी उपाय योजना क्षेत्र हे डोंगर द-यानी व्यापलेले असल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो.पण सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात केवळ भात, नागली, वरई आदी पिके घेतली जातात. पाऊस जास्त असल्यामुळे आपोआपच पिके पन्नास पैसे आणेवारी पेक्षा जास्त येत असतात. मात्र लागवडीलायक क्षेत्र अल्प प्रमाणात असते. ते दरडोई उत्पन्न दहा हजार रुपयापेक्षा कमी असते. विशेष म्हणजे कोकण प्रदेशातील ठाणे, पालघर व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी उपाययोजनातील प्रदेश हा बेसोल्ट प्रकारचा खडक असल्याने पाणी अडवा पाणी जिरवा तसेच पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे पायथा ते माथा हा प्रकार या भागात काहीच उपयोगाचा नसल्यामुळे पन्नास टक्के पाणलोटातील गाव हा निकष या भागात पूर्ण होऊ शकत नाही. दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही आदिवासी तालुके या निकषात बसत नसल्याने शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानापासून वंचित राहणार आहे. परिणामी प्रचंड पाउस पडूनही केवळ नियोजनाच्या अभावी या दोन्ही तालुक्याला पाणीटंचाई चा केविलवाणा सामना करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यात कामे करण्यात यावी अशी मागणी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)