शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक येथे एसटी कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:37 IST

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेशाचे वाटपही करण्यात आले, मात्र या गणवेशाच्या शिलाईच्या मुद्द्यावरून कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याने कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. रेडिमेड गणवेशाऐवजी कर्मचाºयांना कापड देण्याची मागणी केल्याने महामंडळापुढे पेच निर्माण झाला आहे.एसटीच्या चालक-वाहकांसह शहरातील मुख्य ...

ठळक मुद्देघोळात घोळ रेडिमेड गणवेशाबाबत महामंडळापुढे पेच

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेशाचे वाटपही करण्यात आले, मात्र या गणवेशाच्या शिलाईच्या मुद्द्यावरून कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याने कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. रेडिमेड गणवेशाऐवजी कर्मचाºयांना कापड देण्याची मागणी केल्याने महामंडळापुढे पेच निर्माण झाला आहे.एसटीच्या चालक-वाहकांसह शहरातील मुख्य कार्यालय वर्कशॉपमधील कर्मचारी व अधिकाºयांसाठी नवीन गणवेश महामंडळाने तयार केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणच्या डेपोंमध्ये कर्मचाºयांना या गणवेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जात आहे. नाशिकमध्येही वेगवेगळ्या ९ विभाग व श्रेणीतील १८ कर्मचारी तथा अधिकाºयांना नवीन गणवेशाचे मुख्य कार्यालयाच्या आवारात वाटप करण्यात आले आहे. मात्र गणवेश हाती पडल्यानंतर कर्मचाºयांनी गणवेशाचे कापड तसेच शिलाईच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करून गणवेश आरामदायी नसल्याचा आरोप चालविला आहे. गणवेश कुणाच्याही मापात नसल्याने ते परिधान केल्यानंतर आरामदायी वाटत नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात सुमारे ५ हजार कर्मचारी असून, त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात होते. परंतु ते कापड पसंत न पडल्यामुळे कर्मचारी त्यांच्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करून स्वत: खर्च करून गणवेश शिवून घेत होते. पूर्वीप्रमाणेच कर्मचाºयांना गणवेशाचे कापड पुरविण्यात यावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. सध्या शिवून देण्यात येणारे गणवेश कुणालाही योग्य मापात बसत नसल्याने महामंडळाने कर्मचाºयांवर गणवेश लादू नये, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे महामंडळाने गणवेश पुरविले तरी ते कर्मचारी परिधान करतीलच याची कोणतीही शाश्वती नसल्याने महामंडळापुढेही पेच निर्माण झाला आहे.अर्थात साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये कर्मचाºयांना उर्वरित गणवेश दिले जाणार आहेत. आता प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले गणवेशही कर्मचारी वापरत नसल्याने नवे गणवेश कर्मचारी परिधान करतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अर्थात लेखी अथवा संघटनात्मक पातळीवर गणवेशाला अद्याप विरोध करण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसांत गणवेशावरूनही आंदोलन होण्याची शक्यता आहे. गणवेशाची सक्ती न करता त्यातून मार्ग काढण्याचा सूर कर्मचाºयांमध्ये सध्या उमटत आहे.