शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग निश्चित

By admin | Updated: September 11, 2016 02:15 IST

नियोजनबद्ध तयारी : विविध ठिकाणी बैठका, सोशल मीडियाचा वापर

नाशिक : कोपर्डी येथील विद्यार्थिनीवरील अत्याचाराची घटना, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराच्या विरोधात मराठा समाजाकडून २४ सप्टेंबरला शहरातून मराठा क्रांती मूक मोर्चा शहरात काढण्यात येणार आहे. या मोर्चाचा मार्ग निश्चित झाला असून, मोर्चाच्या तयारीसाठी शहरातील विविध भागांत समाजाच्या नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मराठा समाजाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या बैठकांमधून निश्चित करण्यात आलेला मोर्चाचा मार्ग समजावून सांगितला जात आहे. तपोवन परिसरातून मोर्चाला प्रारंभ होणार असून पुढे औरंगाबाद नाका, आडगाव नाका, काट्या मारु ती, निमाणी, पंचवटी कारंजा, व्हिक्टोरिया पूल, रविवार कारंजा, रेडक्र ॉस मार्गे एमजी रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा दाखल होणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी शहरातील विविध भागातून बैठका घेण्यात येत असून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी या बैठकींना उपस्थिती लावत आहेत. मोर्चाचे नियोजन करताना पार्किंगची व्यवस्था आणि शहरात होणाऱ्या गर्दीचे नियोजन मोठे आव्हान असणार आहे. कोपर्डी घटनेचे संपूर्ण राज्यात मराठा समाजातून संतप्त पडसाद उमटत असून औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद आदि विविध जिल्ह्यांत झालेल्या मोर्चांमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होत आहे. स्थानिक नेत्यांकडून या सर्व मोर्चांपेक्षा नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यासाठी शहरातील बैठकांमध्ये तयारी सुरू असून, नाशिकच्या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे पंधरा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाजावरील अन्याय, अत्याचाराच्या खोट्या तक्रारींच्या माध्यमातून अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरुपयोग, रखडलेले मराठा आरक्षण, नोकऱ्यांमधील कमी होणाऱ्या संधी यामुळे मराठ्यांची कुचंबणा होत असल्याची भावना समाजाच्या बैठकींत व्यक्त होत आहे. कोपर्डीच्या घटनेने मराठा समाजातील असंतोष उफाळून बाहेर आला असल्याचा मतप्रवाह या बैठकांच्या माध्यमातून निर्माण केला जात असून, मोर्चाच्या माध्यमातून समाज आपले उत्तरदायित्व निभावेल आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल, अशी भावना बैठकीतून व्यक्त होत आहे. याच आशयाचे संदेश सोशल मीडियातूनही फिरत आहेत. (प्रतिनिधी)