येवल्यातील एका बाधिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:45 IST2020-08-13T20:30:44+5:302020-08-13T23:45:35+5:30

येवला : तालुक्यातील एका बाधिताचा नाशिक रूग्णालयात मृत्यू झाला असून एका महिलेसह तिघे पुरूष असे ४ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक बाधित महिला कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे.

Death of a victim in Yeola | येवल्यातील एका बाधिताचा मृत्यू

येवल्यातील एका बाधिताचा मृत्यू

ठळक मुद्दे४ अहवाल पॉझीटीव्ह; एक कोरोनामुक्त

लोकमत न्युज नेटवर्क
येवला : तालुक्यातील एका बाधिताचा नाशिक रूग्णालयात मृत्यू झाला असून एका महिलेसह तिघे पुरूष असे ४ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक बाधित महिला कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे.
तालुक्यातील गवंडगाव येथील ४० वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील नगरपालिकारोड भागातील ५९ वर्षीय महिलेसह १९ वर्षीय मुलगा, विठ्ठलनगर येथील ५३ वर्षीय पुरूष तर तालुक्यातील पाटोदा येथील ३४ वर्षीय पुरूष असे चौघांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.
यात दोन अहवाल खाजगी लॅबकडील असून २ अहवाल रॅपीड अँटीजेन टेस्टचे आहेत. याबरोबरच औरंगाबाद सिव्हिल रूग्णालयातून शहरातील बाधित ४० वर्षीय महिला कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २६२ झाली असून आजपर्यंत २३१ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या ११ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी हितेंद्र गायकवाड यांनी दिली. बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ६, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात एक तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ४ रूग्णावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Death of a victim in Yeola