शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी शिक्षकांचे कायम होण्यासाठीसाकोऱ्यात घरीच आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:27 IST

साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक विनाअनुदानित/सी.एच.बी व लमसम हंगामी सेवकांना कायम करण्यात यावे, यासाठी नांदगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या साकोरा येथील नऊ शिक्षकांनी आपापल्या घरी राहून साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर मागणीचे निवेदन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच मुख्यमंत्री, राज्यपाल व शिक्षण आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.

ठळक मुद्देदहा ते पंधरा वर्षांपासून अल्प मानधनावर अध्यापनाचे कार्य करत आहेत.

साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक विनाअनुदानित/सी.एच.बी व लमसम हंगामी सेवकांना कायम करण्यात यावे, यासाठी नांदगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या साकोरा येथील नऊ शिक्षकांनी आपापल्या घरी राहून साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर मागणीचे निवेदन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच मुख्यमंत्री, राज्यपाल व शिक्षण आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.महाराष्ट्रात 'रयत शिक्षण संस्थेत' हजारो माध्यमिक उच्च माध्यमिक सेवक गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अल्प मानधनावर अध्यापनाचे कार्य करत आहेत. अल्प मानधनावर प्रामाणिक सेवा करत असतांना रयत शिक्षण संस्थेने सेवकांवर अन्याय केलेला आहे. सेवकांचे हक्काचे अल्प मानधन वर्षभरानंतर तुटपुंजे दिले जाते. सर्व सेवक अध्यापणाचे कामकाज पूर्ण करून मिळेल ते काम रोजंदारीने करून कौटुंबिक गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात. कोरोनामुळे कौटुंबिक परिस्थिती अधिकच हलाकीची झालेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक सेवकांनी न्याय हक्कासाठी आंदोलने केली. प्रत्येक वेळेस संस्थेतील चेअरमन व पदाधिकारी यांनी सेवकांना कायम करु असे आश्वासन देऊन वेळकाढूपणा केला जात आहे.सन २०१६ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळेस माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित, सी.एच.बी व लमसम हंगामी सेवकांना संस्थेमध्ये सामावून घेऊ अशाप्रकारचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. परंतु त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केला. तदनंतर संस्थास्तरावर कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. सन २०१७ मध्ये पुनश्च सर्व सेवकांनी पुणे येथे न्यायहक्कासाठी उपोषण केले होते. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन यांनी रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्याशी संपर्क साधून सदर सेवकांना संस्थेमध्ये सामावून घेण्यात यावे अशा स्वरूपाचे कार्यवाही पर पत्र संस्थेला पाठवले होते.संस्थेने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. अध्यक्ष शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सेवकांना कोर्टामार्फत अर्ज करून संस्थेमध्ये सामील करण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती दिली होती. तसेच साडेतीनशे ते चारशे विनाअनुदानित / सी.एच.बी व लमसम हंगामी सेवकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोर्टामध्ये केस दाखल केली.त्या सेवकांना संस्थेमधून काढून टाकण्यात आले. उच्चशिक्षण घेऊनही कुठल्याही प्रकारचा उपयोग वाटत नाही, म्हणून निराशा निर्माण झाल्याने त् सन २०१८-१९ मध्ये यातील काही सेवकांनी आत्मदहनाचा इशारा संस्थेला दिलेला होता. त्यावेळेस संस्थेने सर्व सेवकांना संस्थेमध्ये सामावून घेण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते. त्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही आजतागायत संस्थेने सेवकांच्या भविष्यासाठी केलेली नाही.त्यामुळे पुन्हा संस्था ह्यांना कायम करत नसल्याने नाईलाजास्तव सर्व सेवक सविनय मार्गाने त्याच्यां न्यायहक्कासाठी दिनांक ९ मे २०२१ पासुन आमरण उपोषण बसलेले आहेत. (१२ साकोरा)

टॅग्स :StrikeसंपTeacherशिक्षक