अभोणा उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: September 10, 2016 00:32 IST2016-09-10T00:32:18+5:302016-09-10T00:32:27+5:30

अभोणा उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

The death of the farmer by hitting the tractor trolley in the abortion subdivision premises | अभोणा उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

अभोणा उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

अभोणा: कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या आदिवासी शेतकऱ्याचा दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत दबून अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कोसवण (ता. कळवण) येथील ढवळू यशवंत चव्हाण (४२) हे आदिवासी शेतकरी ट्रॅक्टर (एमएच ४१, डी. ३३८५)मधून कांदा घेऊन
विक्रीसाठी आले होते. उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागे उभे राहून भ्रमणध्वनीवर बोलत असताना चालकाने (एमएच ४१डी १५५२) ट्रॅक्टर ट्रॉलीसह मागे घेतल्याने शेजारी उभा असलेल्या ट्रालीमध्ये दबून त्यांचा मृत्यू झाला. बाजारातील शेतकरी बांधवांनी त्वरित जखमी शेतकऱ्यास ग्रामीण रु ग्णालयात हलवले.
वैद्यकीय अधिकारी जगदीश चौरे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत अभोणा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ट्रक्टरचालक पंत हिरामण बागुल (३१), रा. कोसवण यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे व सहकारी करीत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: The death of the farmer by hitting the tractor trolley in the abortion subdivision premises