शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ

By admin | Updated: August 22, 2014 00:27 IST

आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ

कनाशी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.या केंद्राला ३४ गावे आणि आठ पाडे जोडण्यात आली आहेत. या गावांची लोकसंख्या सुमारे ४० हजारांवर आहे. मात्र उपचार करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास चव्हाण यांची नांदेड येथे प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर केंद्राचा भार आहे. त्यातही दर महिन्याला आवश्यक कामासाठी त्यांना वारंवार बाहेर जावे लागते त्यामुळे सदरचे प्राथमिक आरोग्य डॉक्टराविना ओस पडलेले असते. सध्या टायफाईड, मलेरिया, डेंग्यू आदि साथींच्या आजारांची लागण झाली असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आदिवासी जनतेला सरकारी दवाखाना नको बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त मलेरियाची चाचणी करण्यात येते. टायफाईड किंवा इतर तपासणीसाठी खासगी लॅबकडे जावे लागत असल्याने रुग्णांना भुर्दंड पडत आहे. रुग्ण कल्याण समिती फक्त कागदावरच कामकाज करत असल्याचा आरोप यानिमित्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)