निऱ्हाळे येथे वानराच्या पुण्यस्मरण सोहळ्यास गर्दी

By Admin | Updated: August 26, 2016 00:14 IST2016-08-26T00:13:56+5:302016-08-26T00:14:04+5:30

निऱ्हाळे येथे वानराच्या पुण्यस्मरण सोहळ्यास गर्दी

The crowds celebrate Vanara's Festival of Worship at Nirmal | निऱ्हाळे येथे वानराच्या पुण्यस्मरण सोहळ्यास गर्दी

निऱ्हाळे येथे वानराच्या पुण्यस्मरण सोहळ्यास गर्दी

 निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे-फत्तेपूर येथे विजेचा धक्का लागून मृत झालेल्या वानराचा चौथा पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चार वर्षांपूर्वी श्रावण महिन्यातच अन्नपाण्याच्या शोधार्थ दहा-बारा वानरांची टोळी निऱ्हाळे गावात आली होती. गावात फिरणाऱ्या वानरांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने स्वसंरक्षणार्थ एक वानर विजेच्या खांबावर चढले होते. घाबरलेले ते वानर विजेच्या तारांपर्यंत पोहोचल्याने विजेचा धक्का लागून ते मृत झाले होते.
यंदाही पुण्यस्मरणानिमित्त अर्चना शिंदे यांचे कीर्तन झाले. विलास काकड यांनी केळी वाटप केली. प्रमोद देशमुख, सरपंच प्रकाश दराडे, पोपट गिते, नारायण केकाणे, विठ्ठल देवकर, किसन काकड, सुभाष यादव, सोपान काकड, सुभाष दराडे, दगडू माळी आदिंसह श्रीराम व महादेव भजनी मंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले. (वार्ताहर)

Web Title: The crowds celebrate Vanara's Festival of Worship at Nirmal